पुणे | गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरून सेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. मात्र अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यासोबत दाराआड चर्चा केली त्यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आमचा कायमचा शत्रू नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिवसेना-भाजप यांची 25 वर्षांची युती तुटली होती. मात्र भविष्यात काय होईल हे आगामी काळात ठरेल, असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली कारण त्यांना माहित आहे सोनिया गांधी या प्रत्येक हालचालींवर नजर ठेऊन आहेत. पण उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ते सोनिया गांधी यांच्या दबावाखाली येणार नाहीत, असंही मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, वीजबिलाच्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
‘ट्रॅक्टर आणि जेसीबी…’; संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणाला…
“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं
धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत; क्रेनद्वारे घातला फुलांचा हार
कोरोनानंतर पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करणार- आदित्य ठाकरे
“संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत”
“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…”