चंद्रपूर | शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. चंद्रपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व देशाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारायला हवं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी राऊतांना चिमटा काढला.
शरद पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं तर वेगवान प्रगती होऊ शकते अशी मिश्कील टिपण्णीही केली. कृषी आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा वेगवान प्रगतीत होईल, असंही मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला मजबूत करण्यासाठी आणि मोदींना हरवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. ते सर्वमान्य नेते आहेत, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलासा
‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत
दिल्लीतील काही लोकं टोमणे मारून माझा अपमान करतात- पंतप्रधान
पुणे तिथे काय उणे! मुंबईकरांना मागे टाकत पुणेकर ‘या’ मध्येही अव्वल
सांगलीतील 16 लाखांचा बकरा गेला चोरीला!