बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मुंबई | शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या याचिकेवेळी मुख्यमंत्र्याकडून केस लढणारे वकील यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. यावर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) आपलं मत मांडलं आहे.

या मागणी नंतर भाजपचे नेते मुनगंटीवार म्हणाले की शिवसेनेवर एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांचाच पूर्ण अधिकार आहे. त्यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी करण्याची गरज नाही. त्यांच्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा आहे. पक्षावर कार्यकर्त्यांचाच हक्क असतो, असं वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.

शिंदे गटाने केलेल्या बंडासंबधी बोलताना मुनगंटीवार म्हणाले 40 लोकांनी हिंदुत्वासाठी बंड केलं. काॅग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी(NCP) सोबत केलेल्या युतीला लाथ मारली. अजुनही काही लोक खुर्चीच्या प्रेमात आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

विजयादशमी हा आनंद वाटण्याचा दिवस आहे. त्यादिवशीही वाद नको. त्यामुळे  याबाबत योग्य निर्णय घ्यावा, असंही मुनगंटीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या

Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील डबल

“महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा सुप्रिया सुळे एखाद्या वरमाईसारख्या वावरत होत्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More