बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

मुंबई | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याला कारण ठरलंय भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांविरोधात आणलेला हक्कभंग प्रस्ताव. मागील तीन दिवस विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला होता. अधिवेशनात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी महिला अत्याचाराच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं 15 डिसेंबर 2020 रोजी आश्वासन दिले होते. सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला. पण अचानकपणे प्रस्ताव मांडला गेल्यामुळे ठाकरे सरकार बरोबर अजित पवारांना देखील बुचकळ्यात टाकलं आहे.

हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीला पाठवण्यात आला आहे. त्याबद्दलचे निर्देश प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत. आमदार आणि खासदार यांना हक्कभंगाचे अधिकार दिले असतात. तर चालू अधिवेशनात राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, विधीमंडळात वैधानिक विकास मंडळाच्या मुद्यावरून भाजप आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली. वैधानिक विकास मंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भिक मागत नाही, आम्ही भिकारी नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर करण्यात येणारा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर?’; जळगाव वसतीगृहातील घटनेवरून मुनगंटीवार संतापले

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More