बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अँजिओप्लास्टीसोबत शुगर-बीपी, खासगी रुग्णालयाने हात झटकले, मात्र सरकारी रुग्णालयाने आजीला वाचवले!

बारामती | एकीकडे कोरोनामुळे लाखोंनी प्राण गमावलेल्या बातम्या समोर येत असल्या तरी दुसरीकडे शंभरी पार केलेले कित्येक वृद्ध बरे होऊन घरी परतल्याचे देखील दिसत आहे. सध्या बारामतीमधून अशीच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे राहणाऱ्या 72 वर्षीय निर्मला पवार यांनी कोरोनाला चितपट केलं आहे.

जगण्याची जिद्द कोणताही रोग बरा करू शकते, असा प्रत्यय निर्मला पवार यांना आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पवार यांना शुगर आणि बीपीचा त्रास आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वीच त्यांना तिसरा हार्ट अटॅक आल्याने त्यांची अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली होती.

अँजिओप्लास्टी झाल्यानंतर महिनाभरातच निर्मला पवार यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने सोमेश्वर येथील एका खासगी कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचारानंतर देखील त्यांची प्रकृती खालावत गेली. काही दिवसांच्या उपचारानंतर खासगी रुग्णालयाने हात झटकत निर्मला पवार यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यास सांगितले.

यानंतर, पवार कुटुंबियांनी निर्मला पवार यांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली या सरकारी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात निर्मला पवार यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. काही दिवसांतच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. एक महिन्याच्या उपचारानंतर सध्या निर्मला पवार कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

“ज्या देशात रनौत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच”

ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा डायरी घोटाळा?; आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता

धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटीहून अधिक भारतीय बेरोजगार

तिने भररस्त्यात स्वत:चे कपडे फाडून घेत दिली धमकी, चिडलेल्या प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More