बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साखरेला चांगला भाव मिळतोय, आमच्या ऊसाचा भावही वाढवा”, राजू शेट्टींचा एल्गार

नाशिक | गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे( Swabhimani Shetkari Sanghatana)  नेते राजू शेट्टी ( Raju Shetty) यांनी राज्य सरकारकडे ऊसाला एकरकमी एफआरपी देण्याची मागणी वारंवार केली आहे. नाशिक येथे बोलताना राजू शेट्टी यांनी ऊसाला (Sugarcane)  प्रत्येक टनाला 3700 रूपये भाव देण्याची मागणी केली आहे.

साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रूपये भाव वाढला आहे. इथेनॉलचे (ethanol) भाव वाढले आहेत. साखरेला चांगले दिवस आले. मात्र, नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच द्राक्ष पिकाचंही अवकाळीनं नुकसान झालं. आता छाटणी कधी करायची असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

बाहेर व्यापारी गायब होण्याच्या घटनाही घडतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी काही तरतूद नाही. त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांना खरेदीसाठी परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली. सरकारने कारवाई केली नाही तर कायदा हातात घेवू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे. साखर कारखान्यांमध्ये गैरव्यवहार होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. काही कारखान्यांची चौकशी होत आहे. परंतु, भाजपमध्ये आले त्यांची चौकशी होत नाही. जे भाजपमध्ये येत नाहीत त्यांची मात्र चौकशी होते, असा जोरदार टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, नाना पटोलेंनी स्वतः दिली गुडन्यूज

या वर्षी 180 टक्क्यांनी वाढला टाटांचा ‘हा’ शेअर, झुनझुनवालांचीही आहे गुंतवणूक

रहमानच्या मुलीच्या आवाजातही आहे जादू, पाहा दुबईतला खास व्हिडीओ

“विराट कोहलीला कायमचा डच्चू, रोहित नव्हे ‘या’ खेळाडूला करणार पूर्णवेळ कर्णधार”

आत्ताची सर्वात मोठी बातमी- परमबीर सिंह पुन्हा पदभार स्वीकारणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More