बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साखरपुडा एकीसोबत, लग्न दुसरीसोबत; जालन्यातील घटनेनं एकच खळबळ

जालना | जालना येथील बदनापूर तालुक्यात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे रहिवासी असणाऱ्या एका तरुणीचं लग्न होणार होतं. साखरपुडा पार पडला, हुंडा देखील देण्यात आला. मात्र नंतर नवरदेवाने खेळच पालटला. नवरदेवाने दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे. मात्र यानंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून मुलीकडचे लोक हैराण झाले आहेत.

बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे रहिवासी असणाऱ्या बाबूलाल हरी जाधव यांच्या मुलीचा विवाह औरंगाबाद तालुक्यात एका तरुणासोबत ठरला होता. संबंधित वधूचं नाव निता असं असून वराचं नाव विजय राठोड असं आहे. नवरदेव आणि नवरीचा साखरपुडा देखील धुमधडाक्यात करण्यात आला. यावेळी वरपक्षाने 2 लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा नवरीचे वडील बाबूलाल जाधव यांनी मुलीच्या सुखासाठी 2 लाख रुपये दिले.

वर पक्षांकडील लोक साखरपुडा झाल्यानंतर लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होते. ठरवलेल्या तारखेला लग्नही झाले नाही. लग्नासाठी उडवा-उडवी करण्यात येऊ लागल्यानंतर आपली फसवणूक केली जात असल्याची बाब नवरीच्या वडिलांना समजली. यानंतर वडील बाबूलाल जाधव यांनी थेट बदनापूर पोलीस ठाणे गाठले आणि फसवणुकीची तक्रार नोंदवली.

दरम्यान, तपास करताना नवरदेवाने दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याचं समोर आलं असून वधू पक्षाची फसवणूक केल्याबद्दल नवरा मुलगा गोविंद राठोड यांच्यासह दिलीप पवार, बबन पवार, नवऱ्या मुलाची बहीण सुनीता पवार आणि आणखी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात पण श्रेय कुणाचं?, मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकून अभिमान वाटेल!

शनिवारी देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, बरे हाेणाऱ्यांची संख्या नव्या रूग्णांपेक्षा 1 लाखाने अधिक

पुण्यात लग्नाचं आमिष दाखवून वर्ग मित्राकडून तरूणीवर अडीच वर्षे बलात्कार

भर चौकात तरुणाला मारणं जिल्हाधिकाऱ्यांना पडलं महागात; थेट मुख्यमंत्र्यांनी तरूणाची माफी मागत केली ‘ही’ कारवाई

पुण्यातील खळबळजनक घटना; शेजारीण चार्जर घेण्यासाठी गेली अन्…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More