बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कुच करा’; खासदार संभाजीराजेंचा कार्यकर्त्यांना आदेश

नाशिक | खासदार संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखीचं पेटत चालला आहे. संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारसमोर पाच प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या, त्यासोबतच ठाकरे सरकारला 6 जून पर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ठाकरे सरकारची मोठी पंचायत झाली होती. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका अद्याप सरकारनं घेतली नसल्यानं आता संभाजीराजे यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

2 जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत त्यांनी पुढील कार्यक्रमाच्या सुचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्याआधी संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौरा केला आहे. या त्यांनी विविध जिल्ह्यातील नेत्यांशी मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे जिल्ह्याबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात प्रवेश नसल्यानं संभाजीराजे आणि प्रशासन आमने-सामने येण्याची शक्यता आहे. आता यावर सरती भूमिका कोण घेणार यावर सर्वांचं लक्ष आहे.

थोडक्यात बातम्या-

“ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रु”

सावधान! ओल्या आणि दमट मास्कमुळे वाढतोय काळ्या बुरशीचा धोका

‘डान्स’मुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महेश लांडगेंनी आळंदीत लावलं लेकीचं लग्न!

संभाजीराजेंंनी केलेल्या हेरगिरीच्या आरोपावर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण!

ब्लॅक फंगसवर ‘हा’ 100 वर्षे जुना फॉर्म्युला ठरतोय प्रभावी; डॉक्टरचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More