‘…त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची का?’, सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल
मुंबई | शिवसेनेचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सध्या शिवसंवाद यात्रा सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आणि महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर प्रथमच त्यांनी जनसंवाद यात्रा केली आहे. आज ते मनमाड मुक्कामी असणार आहेत. शिंदे गटात गेलेले नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यावेळी त्यांना भेट देणार असल्याचे वृत्त आहे. ते पाच हजार कार्यकर्त्यांसोबत त्यांना भेटणार आहेत.
शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार यांना सतत गद्दार म्हटले जात आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदार देखील भलतेच चिडले आहेत. त्यांनी आता शिवसेनेला आणि पक्षाच्या नेत्यांना धारेवर धरत यावर भाष्य केले आहे. शिंदे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना प्रश्न विचारणार आहेत. हिंदुत्वासाठी लढलो, ही माझी चूक झाली का? असा प्रश्न कांदे यांनी ठाकरेंना विचारला आहे.
त्यांना काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांबद्दल आणि त्यांचे नेते आणि आमदारांबद्दल प्रचंड राग आहे. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या (Yakub Memon) फाशीला राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) आणि अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी विरोध केला होता. त्यांच्यावर कांदे यांनी आगपाखड करत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का? असा प्रश्न ठाकरे यांना विचारला.
नवाब मलिकांचे दाऊद इब्राहिमसोबत (Dawood Ibrahim Kaskar) संबंध आहेत. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची कुचेष्टा केली. त्यांनी टी. बाळू (T. Balu) म्हणून चिडवले. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का? असे सु्द्धा यावेळी कांदे म्हणाले. काँग्रेसने वि. दा. सावरकारांना (Vinayak Damodar Savarkar) माफीवीर म्हंटले, त्यांच्यासोबत आम्ही सरकारमध्ये रहायचे का? असे सडोतोड प्रश्न यावेळी कांदे यांनी केले.
थोडक्यात बातम्या –
मॅगझीनसाठी रणवीर सिंग झाला विवस्त्र, न्यूड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो
अंबादास दानवेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…
राष्ट्रपती झाल्यानंतर दौपदी मुर्मूंना मिळणार ‘इतका’ पगार; बंगला आणि गाड्यांसह सुरक्षाही सर्वोच्च
ओबीसी आरक्षणाचे आम्हीच जनक! भाजप-शिवसेनेत श्रेय घेण्यासाठी चढाओढ
नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा!
Comments are closed.