बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नुपूर शर्मांवर हल्ल्याचा कट आखणाऱ्या ‘त्या’ दहशतवाद्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | ISIS चा दहशतवादी अझामोव्ह हा संशयास्पद मार्गाने भारतात प्रवेश करत असल्याचे लक्षात येताच रशियन फेडरल सिक्युरिटीने त्याला अटक केलीय. अटकेनंतर त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आलीय.

भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर हल्ला करण्याचा त्याचा कट होता. ISIS कडून भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. नुपूर शर्मांनी एका टिव्ही शोदरम्यान पैगंबरांबाबत भाष्य केलं होतं तेव्हापासून भारत हाय अलर्टवर आहे. भारतीय एजन्सी ही रशियन आणि उझबेक या दोन्ही समक्षांच्या संपर्कात आहे.

भारताबाबतच्या कटाशी संबंधित सखोल चौकशीसाठी अझमोव्हला त्यांच्याकडं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. शिवाय भारताचे रशियन आणि उझबेक या एजन्सींसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे संबंधित दहशतवाद्याला भारताकडे सोपवण्याची दाट शक्यता आहे. भारतीय एजन्सींनी रशियन एफएसबीला 30 वर्षीय अझामोव्हचा चौकशी अहवाल पाठवण्यास सांगितलं आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More