बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रायव्हरला दिलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे सुजैन खान होतेय ट्रोल, पाहा व्हिडीओ!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नि सुजैन खान सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळत असते. कोणत्या न कोणत्या कारणावरून ती चर्चेमधे असते. अशातच आता सुजैन खानला ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुजैन तिच्या गाडीतून बाहेर पडली आणि छत्री घेऊन निघून गेली. मात्र तिचा ड्रायव्हर पावसात भिजत होता. नेमकं हेच नेटकऱ्यांना खटकलं. त्यावरून नेटकऱ्यांनी सुजैनला ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्यामागोमाग ताहिरा कश्यपही तिच्या गाडीतून उतरताना दिसते. ती देखील ड्रायव्हरकडून छत्री घेते आणि त्याचा विचार न करता पुढे निघून येते.

त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ मुंबईतला आहे. पाऊस आल्यानंतर त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरची चिंता न करता स्वत: छत्री घेऊन गेल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, काहींनी त्यांना पाठिंबाही दिला. सुजैनच्या एका चाहतीने ट्रोलर्सना उत्तर देत म्हटलं, जे म्हणतायत तो बिचारा ड्राइव्हर आहे, त्यांना सांगते की ती ड्राइव्हरला पैसे देते. फुकट काम करायला ठेवलं नाही. तुमच्या घरी कामवाली येते तेव्हा तुम्ही तिच्याकडून झाडू घेऊन स्वतः काम करायला सुरुवात करता का.. काहीही बोलायचं. नेहमी दुसऱ्यांची निंदा करायची.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी वाचा एका क्लिकवर 

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबद्दल मला काहीच माहीत नाही’; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

“कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे संजय राऊतांनी आधी निश्चित करावं”

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 22 कोरोनाबाधितांची नोंद

….म्हणून ओटीटीवरील बिग बाॅससाठी सलमान खानचा नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More