औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेनंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून वंचित बहूजन आघाडीचे नेते व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी टीका केली आहे.
राज ठाकरेंना माझं एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवावे, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सुजात आंबेडकरांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
आतापर्यंत आपण किती दंगली बघितल्या. बाबरी मस्जितची दंगल असो किंवा भीमा कोरेगावची, आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राम्हण असतात, असं वादग्रस्त वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं आहे.
दरम्यान, उच्चवर्गीय ब्राम्हणांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलमध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहुजन मुलं असतात, असंही सुजात आंबेडकर म्हणाले. सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजपचं हिंदुत्व मतलबी आणि तकलादू असल्याचं आता स्पष्ट झालंय”
नोकरीची सुवर्णसंधी! आयटी क्षेत्रातील ‘ही’ नामांकित कंपनी देतेय तब्बल 60 हजार नोकऱ्या
“किरीट सोमय्या असं कॅरेक्टर जे महाराष्ट्रात फक्त भोंगा घेऊन बोंबलतं”
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर, वाचा आजचे दर
“आता भाग सोमय्या भाग चित्रपट काढावा”; राऊतांचा खोचक टोला
Comments are closed.