नगर लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे-पाटलांनी शड्डू ठोकले!

नगर | नगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे यांनी शड्डू ठोकलेत. त्यांनी राहता येथील कार्यक्रमात तशी घोषणाच केली.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ, गणे, विखे आणि तनपुरे साखर कारखाना, विखे फाऊंडेशन तसेच मुळा-प्रवरा वीज संस्था यांची जबाबदारी मी एकाच वेळी सांभाळत आहे. त्यामुळे माझे दाढीचे केसही पांढरे होऊ लागले आहेत, असं सुजय विखे म्हणाले.

दरम्यान, सुजय विखे यांनी लोकसभेसाठी लढण्याची घोषणा केल्याने नगरच्या राजकारणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.