कर्जतमध्ये सुजय विखेंची भव्य पदयात्रा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं पाठबळ

अहमदनगर | डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी पालकमंत्री राम शिंदे चांगलाच घाम गाळत असल्याचं चित्र आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये भव्य पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या पदयात्रेत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राम शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीने केलेलं शक्तिप्रदर्शन राजकीयदृष्ट्या महत्वाचे मानले जात आहे. या भागातून सुजय विखेंना मोठं मताधिक्य मिळेल, असा महायुतीचा अंदाज आहे.

दुरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश महत्वाचा मानला जातो. तर राशीन येथे काँग्रेसचे कार्यकर्ते विक्रमराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात केलेल्या प्रवेशामुळे महायुतीचे पाठबळ वाढत चालल्याचं चित्र आहे.

दरम्यान, या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी युती सरकार कटीबध्द असल्याची ग्वाही राम शिंदे यांनी यावेळी दिली. तर पाणी प्रश्नासाठीच पालकमंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पुढील वाटचाल असेल, असं सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

-‘जिवंतपणी कधी तुम्ही विचारपूसही केली नाही’

-राजू शेट्टी म्हणतात, इचलकरंजीत उद्या इतिहास घडणार कारण प्रचाराला राज ठाकरे येणार

-माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणतो, मुस्लिम समाजाने शिवसेनेसोबत असायला हवं

“हिंमत असेल तर तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मते मागा; मग पाहा निकाल काय लागतो”

-राफेल घोटाळ्याची सखोल चौकशी करून मी सत्य समोर आणणारच- शरद पवार