Sujay Vikhe | देशातील उद्योगपती गौतम अदानी यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांच्या समाधीवर फुलांसह पांढरी शाल अर्पण केली. त्यानंतर गौतम अदानी यांनी पत्नीसह द्वारकामाई तसंच गुरुस्थानला भेट देत दर्शन घेतलं.
यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांच्या हस्ते साईबाबांची पिवळ्या रंगाची शाल, पांढऱ्या रंगाची साईमूर्ती देवून दोघांचाही सत्कार करण्यात आलाय.
अदानींसाठी ड्रायव्हर झाले सुजय विखे
साई मंदिरात पोलिसांसह सीआयएसएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी अदानींच्या गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अदांनींसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) ड्रायव्हर झाल्याचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी म्हटलंय.
साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर गौतम अदानी यांच्यासह त्यांची पत्नी मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांची गाडी माजी खासदार सुजय विखे यांनी चालवली. त्यानंतर अदानी यांचा ताफा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी रवाना झाल्याचं बोललं जात आहे.
साईबाबांच्या दर्शनाच्या वेळी गौतम अदानी आणि त्यांची पत्नी प्रीती अदानी बाबांच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झालेले दिसले. साईबाबांचे दर्शन घेऊन ते मंदिरातून बाहेर आले तेव्हा बाहेर लोकांची मोठी गर्दी झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
एफडीसाठी चांगली संधी! सर्व बँका देतायेत भरघोस व्याज; जाणून घ्या किती?
मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला?, उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा
क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार
महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सर्व दवाखाने राहणार बंद; इमर्जन्सी असल्यास काय?
“नवाब सैफ अली खान तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत?”; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा