Top News महाराष्ट्र मुंबई

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

मुंबई |   भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचं ब्रेन लॉक झालाय, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. अनलॉकिंग आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य शासनाला अपयश आलं आहे, अशी टीका करत राज्यात भाजपचं सरकार असतं तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, असा दावा विखे यांनी केला आहे. टाईम्स नाऊ मराठीने याबाबतचं ट्विट केलं आहे.

सुजय विखे म्हणाले, “बेसिकली महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झाला आहे. त्यांना काहीच समजतं नाहीये की काय सुरू करायचं आणि काय बंद करायचं . त्यांचा ब्रेन लॉक झाल्याने त्यांना काय सुरू करायचं हे कळत नाहीये.”

“मंत्री लॉक झालेले आहेत आणि जनता अनलॉक झालीये. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये देखील सरकारने मिस-मॅनेजमेंट केलंय. मला असं वाटतं की ही नैसर्गिक आपत्ती आहे. मात्र तरीदेखील दुसरी कोणती पार्टी असती तर अशी अवस्था झाली नसती. किंबहुना राज्यात भाजपचं सरकार असतं तर अशी परिस्थिती उद्भवली नसती..”

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

लालबागच्या राजाचा यंदा उत्सव नाही तर 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान!, मुख्यमंत्री म्हणतात…

आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका- रामदेव बाबा

आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीमध्ये शुभेच्छा, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या