बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं”

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 61 गावांमध्ये लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लाॅकडाऊन 10 दिवसांसाठी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावरून आता नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी स्थानिक आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीकास्त्र डागलं आहे.

भाजप आमदार सुजय विखेंनी नगर जिल्ह्यात लावण्यात आलेला लाॅकडाऊन हा अन्यायकारक असल्याचं म्हणत या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना वाचवण्यासाठी अजित पवारांनी हा निर्णय लागू करायला लावला असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्याचा निर्णय कुणी घ्यायला लावला याबद्दल स्थानिक सत्ताधारी आमदारांनी उत्तर द्यावं, असं म्हणत फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं असा गंभीर आरोप सुजय विखे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आकडेवारी लपवली जात असून सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला अन्याय अजिबातच सहन केला जाणार नाही, अशा शब्दात सुजय विखेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. तसेच 2 दिवसात निर्णयावर फेरविचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत त्यांनी या संदर्भातील निवेदन अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र…” राऊतांचा मीडियावर हल्लाबोल

3 बैठकीतही वाद मिटला नाही मग सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं अन्…; गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

“आगामी काळात शिवसेना बॅक टू पव्हेलियन होऊ शकते”

सोशल मीडिया साईट्स तब्बल 6 तास डाऊन, सायबर हल्ला की…

आर्यन खानच्या अडचणी वाढल्या! न्यायालयाने वाढवली आणखी ‘इतक्या’ दिवसांची कोठडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More