सुजय विखेंना पराभव पचेना; घेतला मोठा निर्णय, निलेश लंकेंविरोधात…

Sujay Vikhe | दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते निलेश लंके विरूद्ध भाजपचे नेते सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यात लढत झाली होती. या लढतीत निलेश लंकेंनी विजय मिळवला आहे. मात्र या विजयावर अजुनही निलेश लंकेंनी शंका उपस्थित केली होती.

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरूद्ध सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यात लढत झाली. ग्रामीण भागात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून बदल हवा असल्याचा सूर होता. तोच सूर ठेवत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निलेश लंकेंना मत देत गुलाल उधळला आहे.

निलेश लंकेंच्या विजयावर सुजय विखेंची शंका

विजयाला अनेक दिवस होऊन गेले आहेत. मात्र तरीही निलेश लंकेंच्या विजयावर सुजय विखे (Sujay Vikhe) शंका उपस्थित करत आहेत. यासाठी आता सुजय विखे (Sujay Vikhe) लाखो रूपये खर्च करून निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा ईव्हीएम तपासणीची मागणी करणार असल्याचं समजतंय.

सुजय विखेंची मागणी

एक ईव्हीएम मशीन तपासणीसाठी तब्बल 40 हजार रूपये खर्च येणार आहे. त्यासोबत 18 टक्के जीएसटी देखील भरावी लागणार आहे. यासाठी एकूण 40 मतदान केंद्रांच्या ईव्हीएम मशीनसाठी तब्बल 21 लाख रूपये शुल्क भरले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील हे निलेश लंकेंविरोधात 28 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. लंके विरूद्ध विखे यांच्यातील लढत ही अटीतटीची होती. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये संग्राम जगताप विरोधात सुजय विखेंनी 2 लाख मताने अधिक विजय मिळवला आहे.

मात्र आता सुजय विखे पाटील यांच्या निलेश लंकेंच्या विजयाबाबत मनात पाल चुकचुकत आहे. यासाठी आता त्यांनी तब्बल 21 लाख रूपये शुल्क मोजले आहे. ज्यामुळे निलेश लंकेंची धाकधूक वाढली आहे.

News Title – Sujay Vikhe Doubt On Nilesh Lanke EVM Machine Ahmednagar Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

यंदा वटपौर्णिमा 4 दुर्मिळ योगायोगाने साजरी करा; होणार दुहेरी लाभ

रिल्सच्या नादात जीवघेणा स्टंट; तरूणीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

“पाच महिन्याची गरोदर आहेस, हे शोभतं का तुला?”; दीपिकाच्या ‘त्या’ कृत्यावर नेटकरी भडकले

“अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चाललं असतं”

“उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी नियुक्ती लोकशाहीसाठी घातक”