निलेश लंकेंचं टेंशन वाढणार?, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य

Sujay Vikhe Patil Demand Approve  

Sujay Vikhe | दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते निलेश लंके विरूद्ध भाजपचे नेते सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) यांच्यात लढत झाली होती. या लढतीत निलेश लंकेंनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र या विजयावर सुजय विखे यांनी तेव्हा आक्षेप घेतला होता.

सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी लाखो रूपये खर्च करून निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा ईव्हीएम तपासणीची मागणी केली होती. सुजय विखे पाटील यांनी मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत काही केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या 40 मतदान केंद्रांवर आता..

या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना केली आहे. सुजय विखेंनी (Sujay Vikhe)आक्षेप घेतलेल्या 40 मतदान केंद्रांवर मॉकपोल घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

आक्षेप घेण्यात आलेल्या या 40 मतदान केंद्रांवर मॉकपोल घ्या, अशी सूचना जिल्हा निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. त्यामुळे आक्षेप घेण्यात आलेल्या बुथवरील ईव्हीएमची मेमरी रिकामी करुन मतांची पडताळणी केली जाणार आहे.

नगरच्या राजकारणात सध्या याची जोरदार चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सुजय विखेंना मोठा दिलासा मिळाला आहे. आता याबाबत खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

मॉकपोल नेमकी कशी होणार?

आक्षेप घेण्यात आलेल्या 40 ईव्हीएम मशिनची मेमरी रिकामी करून यात एका मशिनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मतं टाकता येणार आहेत. यात किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असतील. यावेळी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममशिनवरील मतांची पडताळणी होणार आहे. (Sujay Vikhe)

News Title –   Sujay Vikhe Patil Demand Approve  

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत काय?, स्वतः पवारांनी केलं मोठं भाष्य

‘लाडका भाऊ योजने’साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

“वसंत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा करा”; मनसे नेत्यांकडून मागणी

“सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या..”; आषाढी एकादशीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

“शरद पवारांपुढं शकुनी मामाही फेल, मराठा समाजाला त्यांनी खूप फसवलं”

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .