बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, मी कारवाईला घाबरत नाही”

अहमदनगर | अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीवरुन चार्टर्ड विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा अहमदनगरच्या नागरिकांसाठी आणला होता. परंतु या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हस्तक्षेप करून सुजय विखे यांनी आणलेले सर्व रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यावरून आता राजकारण होताना दिसत आहे.

मी किती रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करुन आणली याचा उल्लेख केलेला नाही. मला यावर राजकारण करायचं नाही. माझी बांधिलकी नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बंधनकारक नाही, असं सुजय विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

नगर जिल्ह्यात 12 आमदार आहेत. एकाही आमदाराने या सगळ्याविषयी फसवेगिरीचा प्रश्न उपस्थित केला आहे का? त्यांना हा स्टंट वाटत असेल तर मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्याला सर्व पुरावे देईन, असं सुजय विखे-पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मी कारवाईला घाबरत नाही, असं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुजय विखे यांनी आणलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा गरजूंना लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

कडक लॅाकडाऊन मात्र शेगावच्या लॅाजवर सुरु होता अत्यंत धक्कादायक प्रकार

लायकी काढत चक्क नर्सने लगावली डाॅक्टरांच्या कानशिलात, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

“लोकांना हॅास्पिटलमध्ये बेड मिळेनात मग संघमालक, सरकार IPLवर प्रचंड पैसा का खर्च करतंय”

खेळ महत्त्वाचा नाही! 30 ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा आयपीएलबद्दल मोठा निर्णय

धक्कादायक! पोलिसाच्या नावे बनावट अकाऊंट उघडुन ढोंग करत मागितली ‘एवढी’ रक्कम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More