अहमदनगर | लोकसभेला पक्ष उमेदवारी देईल का नाही हे सांगता येत नाही, मात्र श्रीगोंदेकरांनी माझ्यासोबत राहावे, असं आवाहन डाॅ. सुजय विखेंनी केलं आहे. ते श्रीगोंद्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
राजकारणात आलो ते कुणाच्या डोक्यावर बसून नव्हे, अथवा सत्ता भोगण्यासाठीही नाही. सामान्यांना न्याय देण्यासाठी लढत आहे, असंही ते म्हणाले.
लोकसभा निवडणूक जागा वाटपात काय होईल ते नंतर ठरेल, पक्ष मला न्याय देईल की नाही हेही आत्ता सांगता येत नाही, मात्र लोक माझ्यासोबत राहतील. जे लोक आमच्यासोबत राहतील त्यांना विखे कुटुंबाची आयुष्यभर मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राजकारणात घराणेशाही आहे, आमच्यावरही आरोप होतात, पण लोक स्वीकारतात. काही ठिकाणी चौथी पिढी राजकारणात आहे. आम्ही लोकांच्यातील कार्यकर्ते आहोत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-उदयनराजेंना रिप्लेस करणार का? रामराजे म्हणतात…
-आता सरकार आणि रिझर्व्ह बँकेत वाद; उर्जित पटेल देणार राजीनामा?
-सरदार पटेल नसते तर चारमिनार पाहण्यासाठी व्हिसा लागला असता!
-राफेल प्रकरण झाकण्यासाठी सीबीआयचा वाद; भाजप खासदाराचा घरचा आहेर !
-लोकार्पण सोहळ्याच्या विरोधात होणार होतं आंदोलन; मात्र…
Comments are closed.