तू जेवढ्या जास्त लोकांना फोन लावशील तेवढं माझं लीड वाढेल- सुजय विखे

अहमदनगर | माझ्या सभेला किंवा रॅलीला कुणी दिसलं की त्यांना लगेचच फोन यायला सुरुवात झाली आहे. पण एक लक्षात ठेवा जेवढ्या लोकांना फोन लावाल तेवढं माझं लीड वाढेल, अशा शब्दात नगरचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर तोफ डागली आहे.

चिचोंडी पाटील येथे सुजय विखे यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवसेना उपनेते अनिल राठोड उपस्थित होते.

खासदार झाल्यावर सर्वात आधी या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवेन. पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही तर पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही, असं विखे म्हणाले.

दरम्यान, संसदेत बोलायला इंग्रजी यावं लागतं. यांना हिंदीसुद्धा नीट येत नाही. मग हे संसदेत पाण्याचा प्रश्न कसा मांडणार?, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

-आजपर्यंतच्या इतिहासात मोदी हे सर्वात जास्त निर्लज्ज पंतप्रधान- राज ठाकरे

-“भाजपवाले पैसे वाटतील… यांनी देश लुटलाय… आता वेळ आलीय यांना लुटायची”

-राज ठाकरेंनी भर सभेत भाजपच्या स्वंयघोषित विकासचा बुरखा फाडला!

-“काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं?”

-“आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना रोजगार द्या; आपल्याला आरक्षणाची गरजच नाही”