अहमदनगर | जलसंपदा खात्यात 20 हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय. हे भ्रष्टाचारी नेते दोन-अडीज वर्षात तुरूंगात जातील, असं वक्तव्य अहमदनरचे खासदार सुजय विखे यांनी केलं आहे. ते राहुरीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
सहकार चळवळ मोडून ज्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्याचं आणि प्रपंचाचं वाटोळं केलं. शुल्लक आणि कवडीमोल दराने कारखाने विकले त्यांच्यामागे आता ईडी चौकशी लागली आहे, असं म्हणत त्यांनी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गुरूवारी विधानसभेसाठीचा अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या सभेत सुजय यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.
अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला कायमची हद्दपार करायची आहे, असंही सुजय म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“निवडून आलो नाही तर वडिलांचं नाव लावणार नाही”- https://t.co/qJ7wjSD1PA @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून मॉडेल आहेत” https://t.co/Bl2eMLduva @kanhaiyakumar @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
आदित्य ठाकरेंच्या शक्तिप्रदर्शनावेळी पाकिटमारांनी दाखवली शक्ती, मोठमोठ्या नेत्यांची पाकिटं गायब
–https://t.co/AOGtdECcR0 @Shivsena4Maha— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.