…तर तुतारी वाजवून टाका!; भाजप उमेदवार सुजय विखेंच्या आवाहनामुळे नगरमध्ये एकच खळबळ

Sujay Vikhe | लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तशा राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घटना घडताना दिसत आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवणार आहेत. अशातच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मात्र आता अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमची अडचण होत असेल तर तुतारी वाजवून टाका, असं वक्तव्य भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याची राज्यात चर्चा होताना दिसत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पराभवाची भीती की आणखी काय?, सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी असं वक्तव्य करण्यामागचं कारण काय? असा सवाल आता विचारला जातोय.

…तर तुतारी वाजवून टाका-

एका प्रचारसभेमध्ये बोलताना सुजय विखे म्हणाले की “आमची अडचण होत असेल तर मोदींचे नाव सांगा. आमच्या दोघांची अडचण होत असेल तर ताईंचं नाव सांगा. आमच्या तिघांची अडचण होत असेल तर अरुण मुंडेंचं नाव सांगा, जर सर्वांचीच अडचण होत असेल तर मग तुतारी वाजवून टाका”, असं म्हणत सुजय विखेंनी भरसभेत थेट आपले हात जोडले.

सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विखे यांनी असं वक्तव्य का केलं असावं?, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यामुळे अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत. त्यांनी आपल्या विरोधी पक्षाच्या चिन्हाचं बटण दाबण्याबाबत वक्तव्य केलं आहे. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

सुजय विखेंना निवडणूक जड जाणार-

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ मानला जात होता, मात्र निलेश लंके यांच्या उमेदवारीनं या मतदारसंघाची सारी गणितं बदलून गेली आहेत. एकतर्फी सामना होईल अशी परिस्थिती असताना सुजय विखे यांना लंकेंचं आव्हान तयार झालं आहे. सुजय विखे यांचं वरील वक्तव्य म्हणजे एकप्रकारे त्यांची पीछेहाट होत असल्याचं लक्षण आहे. या वैतागातूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. एकूण विखे पाटलांसाठी ही लढत म्हणजे करो किंवा मरोची स्थिती बनली आहे.

News Titlle – Sujay Vikhe Statement About Trumpet Sign Of Sharad Pawar party

महत्त्वाच्या बातम्या

“वाढपी वाढतोय म्हणजे..”, राजेंद्र पवार अजित पवारांवर संतापले

काळजी घ्या! ‘या’ शहरात 10 वर्षानंतर सर्वाधिक तापमान

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा अपघात, फोटो आला समोर

“अस्तित्वालाच नाकारण्याचं काम…”, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

‘…म्हणून मध्येच चित्रपट सोडला’; रणदीपबद्दल महेश मांजरेकर स्पष्टच बोलले