अहमदनगर महाराष्ट्र

रिक्षाप्रमाणे तीन‌ चाकी सरकार चालवणंही मुश्कील आहे- सुजय विखे

अहमदनगर | तीन चाकी रिक्षा चालवणं अवघड आहे. त्यामुळे तीन‌ चाकी सरकार चालवणंही मुश्कील असल्याने पाच वर्ष सरकार टिकूच‌ शकत नाही, असा टोला भाजप खासदार सुजय विखेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

श्रीरामपुरातील आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या‌ जनसंपर्क कार्यालयात कोरोना तपासणी केंद्राच्या‌ उद्घाटनानंतर सुजय विखेंनी तीन चाकी रिक्षा‌ चालवून पाहिली. यावेळी बोलताना विखेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

तीन चाकी रिक्षा चालवणं एवढे सोपं नाही. रिक्षा चालवताना स्पीड कमी केला. स्पिडब्रेकर आल्यानंतरही रिक्षा‌ हळू घेतली. त्यात बसलेल्या प्रवाशांना भिती वाटत‌ होती. त्यामुळे राज्यातील तीनचाकी सरकार चालवणं देखील अवघड आहे हे लक्षात आलं. त्यामुळे हे तीनचाकी‌ सरकार किती दिवस चालेल, किती स्थिर चालेल त्यात‌ बसलेले लोकं किती‌ घाबरुन आहेत हे पाहिलं, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे.

हे सरकार सर्व पातळीवर फेल झाले आहे. कोरोनाच्या‌ बाबतीतही हे फोल ठरलं. पिकाच्या‌ नुकसानीचे पंचनामे नाहीत, अशा अनेक अडचणीत सापडलेले हे सरकार पाच वर्ष चालुच शकत नाही याचा मला विश्वास वाटतो, अशा शब्दात सुजय‌ विखे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतसोबत आता दिशा सालियान प्रकरणाचीही चौकशी सीबीआयद्वारे होणार

‘….अन् सामनाचे संपादक तोंडावर पडले’; नारायण राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका

परदेशातून मुंबईत येणाऱ्या व्यक्तींसाठी आता ‘हा’ निर्णय बंधनकारक; किशोरी पेडणेकरांची माहित

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘लालपरी’ उद्यापासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार

सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या