“राष्ट्रवादीचा जन्मच शिवसेनेला संपवण्यासाठी झालाय”
मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार राडा सुरू आहे. राज्याची राजधानी मुंबईत शिवसेना भवन परिसरात दोन दिवस छावणीसारखा बंदोबस्त करण्यात आला होता. त्यावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. अशातच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचा जन्मच शिवसेना संपवण्यासाठी झाला आहे. दोन वर्षात शिवसेना संपल्याशिवाय राहाणार नाही, असं भाकित खासदार सुजय विखेंनी वर्तवलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नादी लागू नये, जेवढं होईल तेवढं लवकर बाजूला व्हावं, असा सल्ला देखील शिवसेनेला विखे पाटील यांनी दिला आहे.
एकीकडे सामान्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते तर दुसरीकडं राष्ट्रवादी संकल्प सभा घेत होती. शरद पवार यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा साधा उल्लेखही केला नाही, अशी टीका सुजय विखेंनी केली आहे. राज्य सरकारनं वादाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा महागाई, शेतकरी या प्रश्नांवर बोलावं, असं विखे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, सुजय विखेंनी राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर अन्याय होत असल्याची भावना अनेकदा मांडली आहे. परिणामी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून देखील सुजय विखेंना लक्ष्य करण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या –
“लतादीदी मला नेहमी म्हणायच्या माणूस आपल्या वयानं नाही तर…”, नरेंद्र मोदी भावूक
“माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं…”, सचिनला लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; पाहा व्हिडीओ
भाजप नेत्यांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी तर फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतूक, म्हणाले…
“…नाहीतर उद्या कुणीही सुरक्षित राहणार नाही”
“कोण हा फडतूस रवी राणा?, प्रश्न जर सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या…”
Comments are closed.