नगर | इंदोरीकर महाराज मोठे कीर्तनकार आहेत. त्यांच्या कीर्तनातून ते समाज प्रबोधनाचं काम करत असतात. त्यामुळे एका वादग्रस्त वाक्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. हा वादच निरर्थक असून इंदोरीकर महाराज हे नगर जिल्ह्याचं भूषण असल्याचं भाजप नेते सुजय विखे यांनी म्हटलं आहे.
इंदोरीकर महाराजांची कीर्तन करण्याची स्वत:ची पद्धत आहे. ती पद्धत लोकांना आवडते. समाजावर ते कठोर प्रहार करतात. लोकशाहीत सर्वांना मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्या मताचे जे काही चांगले वाईट परिणाम होतात. ते त्या व्यक्तिला भोगावे लागतात. त्यामुळे वाद करण्याचं कारण नाही, असं सुयोग विखे यांनी सांगितलं आहे. विखेंच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मीही आक्रमक भाषण करतो. मलापण काही जण येऊन सांगतात. पण ज्यांना माझं भाषण स्वीकारायचं ते स्वीकारतात आणि ज्यांना नाही आवडत ते नाही स्वीकारत. इंदोरीकरांच्या बाबतीतही तेच म्हणावं लागेल, असंही विखेंनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काल अकोलेकरांनी इंदुरीकरांच्या समर्थनार्थ अकोल्यात कडकडीत बंद पाळला होता. त्यासोबत ते सर्वजण रस्त्यावर उतरले होते.
ट्रेंडिंग बातम्या-
नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना होणार नाही- शाहिद आफ्रीदी
DJ च्या तालावर बापानं काढली 22 वर्षीय मुलाची अंतयात्रा!
महत्वाच्या बातम्या-
भाजपच्या ‘या’ नेत्याचा जातीचा दाखला रद्द?; खासदारकी धोक्यात
माळेगाव निवडणूक: अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, विरोधकांचा मतमोजणीवर आक्षेप
चंदनतस्कर विरप्पनच्या मुलीनं हाती घेतलं कमळ!
Comments are closed.