“…म्हणून नोराला जॅकलिनचा राग येतो”
मुंबई | 200 कोटी मनी लाॅड्रिंग प्रकरणात सध्या महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) जेलमध्ये आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याविरोधात देखील कोर्टात केस सुरु आहे. याचदरम्यान नोराने जॅकलिनवर मानहानीची केस दाखल केली आहे.
यामुळेच या दोन्ही अभिनेत्रीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या वादावर एक मोठा गौप्यस्फोट सुकेशने केला आहे. त्याने जेलमधून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने नोरावर (Nora Fatehi) काही आरोप केले आहेत.
नोराला मी जॅकलिनसोबत नात्यात असलेलं आवडायचं नाही. अनेकदा तिनं मला जॅकलिन (Jacqueline Fernandez) सोबत ब्रेकअप करण्यास सांगितलं होतं, असं सुकेशने पत्रात लिहिलं आहे. मी आणि जॅकलिन एका गंभीर प्रकारच्या नात्यात होतो. नोराला वाटायचं की मी जॅकलिनला सोडावं आणि तिला डेट करावं. मला मात्र तसं काही करायचं नव्हतं.
यामुळेच नोराला जॅकलिनचा प्रचंड राग येतो. अनेकदा ती मला पुन्हा पुन्हा फोन करुन त्रास देत होती. नोराने जॅकलिनवर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सुकेशने पत्रात म्हटलं आहे. नोराने ED आणि EOW समोर वेगवेगळे जबाव दिलेले आहेत. ती तिच्या मनातील कहाणी सांगत असल्याचं सुकेशने त्याच्या पत्रात सांगितलं आहे.
नोराला आवडणाऱ्या बॅग,ज्वेलरी यांचे फोटो ती मला पाठवायची आणि मी त्या तिला घेऊन द्यायचो. आजही तिच्याकडे त्या वस्तू आहेत. ती त्या वापरत आहे. मी तिला त्या घेऊन दिल्यामुळे तिच्याकडे त्याचं बील नाही आहे. मी तिला ती कार घेऊन दिली होती. ज्यांचे स्क्रिनशाॅट अजूनदेखील ED कडे आहेत, असं देखील सुकेशने पत्रात नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.