Top News फोटो फिचर

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शंख वाजवण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदाराला कोरोनाची लागण!

जयपूर | भाजपचे खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनी या व्हिडिओमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शंख वाजवण्याचा आणि चिखलामध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र सुखबीर सिंह जौनापुरिया यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

सुखबीर सिंह जौनापुरिया हे राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मागील काही दिवसांपासून सुखबीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. यामध्ये सुखबीर हे चिखलामध्ये बसल्याचे दिसत असून त्यांच्या हातात शंख होता.

रोगप्रिकारशक्ती वाढवण्यासाठी फुफुसे आणि किडनीचे आरोग्य उत्तम असणं आवश्यक असल्याचं सुखबीर सिंह जौनापुरिया यांनी सांगितलं होतं.

रोगप्रतिकारशक्ती गोळ्या खाऊन वाढत नाही तर नैसर्गिक गोष्टींमुळे ती वाढते, असंही सुखबीर म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

“राजभवनाचं सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून नामकरण करावं का?”

शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी- खासदार संभाजीराजे़

‘महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी’; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या