बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली |  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या पदासाठी अनेक नेत्यांची नाव आघाडीवर आहेत. काॅंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर नाकारल्यानंतर पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण ठरणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. मात्र आताच हाती लागलेल्या बातमीनूसार काॅंग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी एका शीख व्यक्तीलाच राज्याचं प्रमुख बनवलं पाहिजे. त्याचबरोबर प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्रिपदासाची ऑफर नाकारत असल्याचं अंबिका सोनी यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पंजाब काॅंग्रेस पक्षाने ‘सुखजिंदर सिंग रंधावा’ या नेत्याचं नाव निश्चित केलं. या संदर्भात पंजाब काॅंग्रेसने सोनिया गांधी यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

पंजाब राज्यात जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न काॅंग्रेस करताना दिसत आहे. त्यासाठी अरूणा चौधरी आणि भारत भूषण आशू या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. आपणास कुठल्याही पदाची अपेक्षा नसल्याचं सुखजिंदर सिगं रंधावा यांनी म्हटलं होतं. तरीही काॅंग्रेस पक्षाने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी केली आहे.

दरम्यान, पंजाबच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच आता काॅंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला आहे. परंतु अजुनही सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावावर हायकमांडकडून शिक्कामोर्तब होण्याचं बाकी आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप नेते किरीट सोमय्या स्थानबद्ध???; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने खळबळ

‘डाॅल्फिनने माझ्यासोबत सेक्स केला अन् …’, महिलेने केला अजब खुलासा

…म्हणून अंबिका सोनींनी नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर

नदीच्या प्रवाहात अडकला मुलगा, तरूणीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ चुका टाळव्यात, अन्यथा गमवाल आपले प्राण!!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More