बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑलिम्पिकनंतर पॅरालिम्पिकमध्येही भारताला भालाफेकमध्ये सुवर्ण, सुमित अंतिलने रचला इतिहास!

मुंबई | ऑलिम्पिकनंतर पॅरालिम्पिकमध्येही भारताला सुवर्ण मिळालं आहे. भारतीयांनी पदकांची लयलूट केली असताना दुसऱ्या सुवर्णपदकामुळे आणखी एका पदकाची भर पडली आहे. भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात विश्वविक्रम रचत सुवर्ण मिळवून दिलं आहे.

आजच्या दिवसातील भारताचं हे पाचवं पदक असून भारताला एकूण पदके मिळाली आहेत. भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात विश्वविक्रम रचत सुवर्ण मिळवून दिलं आहे. योगायोग असा की, भारताला ऑलिम्पिकमध्येही भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. नीरज चोप्राने भारताला एकमेव सुवर्णपदक तेही अखेरच्या दिवशी मिळवून दिलं होतं.

सुमित अंतिल याने पहिल्याच प्रयत्नांत 66.95 मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी लांब भाला फेकताना 68.8 मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. तिसऱ्या प्रयत्नात सुमितनं 65.27 मीटर भालाफेक केला आहे.

दरम्यान, भारतीय नेमबाज अवनी लेखराने सुवर्ण पदक मिळवलं होतं. यानंतर थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाकडून रौप्य, भालाफेक पटू देवेंद्र झाजरिया रौप्य, सुंदर सिंगकडून कांस्य मिळवलं.

थोडक्यात बातम्या- 

काय सांगता! हवेत तरंगतोय पिझ्झा?, व्हिडीओ तुफान व्हायरल

“चंद्रकांत पाटील पलंगावरून पडले तरी, त्यांना सरकार पडल्यागत वाटत असेल”

भारताला धक्का! पॅरालिम्पिकमधील विनोद कुमारांचं कांस्यपदक काढून घेतलं

आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन घेऊन जाणं होणार सोपं, पाहा व्हिडीओ

धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळलेल्या ‘या’ खेळाडूने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय !

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More