देश

आपल्याच पक्षाचं सरकार असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत- सुमित्रा महाजन

भोपाळ | भाजप खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून मी महत्त्वाचे विषय उपस्थित करायचे, असं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.

राज्यात भाजपचं  सरकार असताना महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे, असंही सुमित्रा महाजन यांनी सांगितंल आहे. राज्यपाल लालजी टंडन यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी भाजपचं सरकार होतं. आपल्याच पक्षाचं सरकार असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. मात्र इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करायला हवेत असं मला कायम वाटायचं, असं म्हणत सुमित्रा महाजन यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान, मी अनेकदा काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे. त्यांच्या माध्यमातून अनेकदा जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे उचलायचे, असं सुमित्रा महाजन म्हणाल्या आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या