Top News देश

अमित शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने बजावले समन्स!

Photo Courtesy- Facebook/@amitshahofficial

कोलकाता | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालच्या एका न्यायालयाने समन्स बजावले आहे. 2018 ला एका भाषणामध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात अमित शहा यांनी अनेक आरोप केले होते याच आरोपांवर आक्षेप घेत अभिषेक बॅनर्जी यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अभिषेक यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार कोलकाताच्या विशेष न्यायालयाने अमित शहा यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अमित शहा यांच्या नावाने एक समन्स बजावून त्यांना हजर राहण्यास विधान नगर येथील विशेष न्यायालयाने सांगितले आहे. विधाननगर न्यायालय हे आमदार आणि खासदारांचे प्रकरण निकाली लावण्यासाठी तयार करण्यात आलेले न्यायालय आहे.

शहा यांनी खोटे संदर्भ दिले आणि मुख्यमंत्र्यांचा पुतण्या असा उल्लेख करत बिनबुडाचे आरोप केल्याचं अभिषेक बॅनर्जी यांनी त्याच्या दाव्यात म्हटलं आहे. अमित शहा यांना आता विशेष न्यायालयात हजर राहणं बंधनकारक असून निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडल्याने त्याचा पक्षावर परिणाम होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा निर्णय!

अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना- जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद शहरात विना-मास्क ऑटो चालकांवर होणार ‘ही’ कारवाई

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

संतापजनक! शौचासाठी शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या