Nagraj Manjule l सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या कामगिरीने मनोजरिं सृष्टीवर वेगळीच छाप पडली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील नागराज मंजुळे यांची प्रचंड क्रेझ आहे. मात्र आता दिगर्दशक नागराज मंजुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
नेमकं प्रकरण काय? :
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या सिनेमाची कथा आता वादाच्या भोवर्यात सापडली आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी केलं आहे. यावेळी सिनेमाच्या कथेवरून वाद सुरु असताना संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत नागराज मंजुळे यांच्यासह आटपाट प्रोडक्शन, जिओ स्टुडियो, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क हे 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्र देखील संजय दुधाणे यांच्याकडे आहेत.
Nagraj Manjule l नागराज मंजुळे सापडले वादाच्या भोवऱ्यात? :
याप्रकरणी सिनेमाच्या निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई आणि ठरावासाठी संजय दुधाणे यांच्याकडून अॅड. रविंद्र शिंदे व अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा देखील दाखल केला आहे. तसेच यासंदर्भात जातीने हजर राहण्याचे समन्स देखील न्यायालयाने नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे यांना पाठवलं आहेत.
परंतु, दिग्दर्शक नागराज मंजुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने या चित्रपटाचं पुढे काय होणार याकडे सर्व चाहत्यांचा लक्ष लागलं आहे.
News Title – Summons to Nagraj Manjule from court
महत्वाच्या बातम्या-
राज्याला मिळणार ओबीसी मुख्यमंत्री?, नव्या मागणीची जोरदार चर्चा
पडळकर ते राणे, मंत्रीमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?; वाचा संपूर्ण यादी
एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार; कोण होणार पुढील CM?
आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!
अभिषेक बच्चनकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाला,”मला माहित होतं की ऐश्वर्या…”