अहमदाबाद | भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसरा दिवस भारतानं गाजवला. भारतीय संघानं तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 365 धावसंख्या उभारली. या डावात भारताचा अष्टपैलू खेळाडू वाॅशिग्टन सुंदरचं शतक फक्त 4 धावाने हुकलं.
पाहुण्या संघाचा पहिला डाव 205 धावावर आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. शुभमन गिल आणि कर्णधार कोहलीला खातं देखील उघडता आलं नाही. त्यानंतर धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याने फटकेबाजी करत शतक केलं. तर त्याला वाॅशिग्टन सुंदरने मोलाची साथ दिली. पण अक्षर बाद झाल्यावर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज एकापाठोपाठ बाद झाले.
अक्षर पटेल बाद झाल्यावर सुंदर 96 वर खेळत होता. तर भारताचे दोन फलंदाज बाकी होते. पंत पाठोपाठ सुंदरचे देखील शतक होईल अशी अपेक्षा होती. परंतू इंग्लंडच्या बेन स्टोकने एकामागे इशांतचा अणि सिराजचे बळी घेतले. त्यामुळे सुंदरचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. यामुळे भारतीय प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे.
दरम्यान, शेवटच्या वृत्तानुसार इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 65 धावावर 6 बळी गेले होते. या सामन्यात भारताची मजबूत स्थिती पाहता, मागील सामन्याप्रमाणे हा सामना देखील लवकर आटोक्यात येण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली
ओडिशातील धक्कादायक घटना; पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं
तुमच्या अर्णबला जेलमध्ये टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग का?- अनिल देशमुख
“शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?”
Comments are closed.