Sunetra Pawar Banner | बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची लढत होती. याकडे केवळ राज्य नाहीतर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळाली होती. याची जोरदाच चर्चा झाली. मात्र बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना विजयी केलं. यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीचा गड राखता आला.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar Banner) पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं. मात्र बारामतीत पराभव झाला तरीही आमदार आणि खासदार होता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनेत्रा पवारआहेत. तर काही वर्षांआधी भाजपचे नेते गोपिचंद पडळकर विरूद्ध अजित पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीत लढत झाली होती. यामध्ये अजित पवारांनी विजय मिळवला होता. मात्र त्यावेळी 2020 मध्ये भाजपने गोपिचंद पडळकरांना विधानसभा परिषदेतून आमदारकी मिळवून दिली होती.
अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात अभिनंदन केलं जात आहे. त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर (Sunetra Pawar Banner) लावण्यात आलेत. त्यामध्ये पुण्यातील कात्रज येथील चौकामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने बॅनरबाजी केली. त्या बॅनरची (Sunetra Pawar Banner) जोरदार चर्चा आहे.
नेमकं बॅनरवर काय आहे?
सुनेत्रा पवारांच्या बॅनरबाजीची (Sunetra Pawar Banner) एकच चर्चा होताना दिसत आहे. पुण्यातील कात्रच्या चौकामध्ये सुनेत्रा पवारांची बॅनरबाजी (Sunetra Pawar Banner) करण्यात आली आहे. त्याची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने रिपाईच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. त्या बॅनरवर “हारकर जितनेवाले को बाजीगर कहते है”, अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. त्यामध्ये रिपाईंच्या कार्यकर्त्यांचे देकील फोटो असून खासदार सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचा फोटो दिसत आहे. त्यानंतर आता बारामतीतही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
बारामतीतही बॅनरबाजी
बारामतीतही सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करण्यात आले. भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्याची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तेव्हा सुनेत्रा पवारांचा राज्यसभेवर खासदार झाल्यानिमित्ताने हार्दिक अभिनंदन असा त्यात उल्लेख करण्यात आला आहे.
सुनेत्रा पवारांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी बोलत असताना सांगितलं की, बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत असताना मला अनेक समस्या जाणवत आहेत. त्या सोडवण्याचा मी प्राधान्य देणार आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रश्नावर विचारल्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की मला केंद्रीय मंत्रीपद मिळालं तर मी त्याचं सोनं करेल.
News Title – Sunetra Pawar Banner At Pune Katraj Circle About MP Selection
महत्त्वाच्या बातम्या
‘त्या’ बॅनरमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ; थेट राणेंना इशारा?
आनंदवार्ता! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, ‘इतक्या’ घरसल्या किंमती
शेतकऱ्यांनो PM Kisan चा 17 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; 95 रुपयांची बचत बनवेल लखपती!
तरुणांनो सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL विभागाअंतर्गत भरती सुरु