Top News आरोग्य औरंगाबाद कोरोना महाराष्ट्र

जिल्हाधिकारी असावा तर असा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय!

Photo Credit- Facebook/ Payal Chavan

औरंगाबाद | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. याबरोबरचं कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत अशा सूचना सरकारने केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची मुलगी पायल चव्हाण यांचा विवाह सोहळा औरंगाबाद शहरातील एका पंचतारांकित हॉटलेमध्ये 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याच दिवशी लग्नानंतर तिथेच स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याकरिता अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाचं सावट लक्षात घेता त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात कोरानाचं संकट पुन्हा वाढत आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं कोरोनाचे नियम कडक पाळण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मंगल कार्यालय व इतर ठिकाणी आयोजित लग्न सोहळ्याला राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे केवळ 50 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, नागपुरसह विदर्भातदेखील काही शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई पाठोपाठ आता नागपूर महानगरपालिकेनेही कोविड-19च्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

थोडक्यात बातम्या-

हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले

पुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार!

आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…- सदाभाऊ खोत

शर्मिला ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या