बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची, करावे तसे भरावे”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यात काही तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावाही शरद पवारांनी यावेळी केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे रुग्णालयात आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. असं पवारांनी स्पष्ट केलंं.

या सर्व ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणावर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे नेते सुनील देवधर यांनीही ट्वीट करून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे. असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला.

भाजप नेते सुनील देवधर यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हटलं आहे की, “शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे, अनिल देशमुख प्रकरणात ते पुन्हा एकदा समोर आले. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडं पाडलं. उतारवयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची.” असं ट्विट करत शेवटी ‘करावे तसे भरावे’ असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप होत आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याचबरोबर विरोधीपक्षाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. काँग्रेस हायकमांडही पक्षाची नाहक बदनामी होत असल्याने या प्रकरणावर आज निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.हायकमांडने तसे आदेशही राज्यातील काँग्रेस नेत्यांना देऊन अहवाल सादर करण्यास सांगितल्याचं समजतंय.

थोडक्यात बातम्या –

शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याची शिवसेनेला सोडचिठ्ठी

45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ‘या’ तारखेपासुन सरसकट लस मिळणार; केंद्राची मोठी घोषणा

हरियाणातील धक्कादायक प्रकार! भर सभेत महिला IAS ऑफिसरची काढली छेड 

IPS रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More