बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबई इंडियन्सला हरवणं ही सर्वात मोठी गोष्ट’; भारताच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

मुंबई | आयपीएलचा 14वा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 9 एप्रिलला या हंगामातला पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक मैदानावर खेळवला जाणार आहे. आयपीएलचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. तर या हंगामात कोणता संघ बाजी मारेल यावर आतापासूनच चर्चेला उधाण आलं आहे. भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्स संबंधी मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्याच्या चालू हंगामात मुंबई इंडियन्सला हरवणं ही मोठी गोष्ट असेल. मुंबईच्या खेळाडूंचा सध्याचा फाॅम पाहता मुंबईला हरवणं एवढी सोपी गोष्ट असणार नाही. इशान किशन, सुर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या असे एकापेक्षा एक मोठे खेळाडू या संघात आहेत. त्यामुळं मुंबईला हरवणं हे इतर संघासाठी कठीण आहे, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

हार्दिक पांड्यानं गोलंदाजी करणं, हे फक्त मुंबईसाठीच नव्हे तर भारतासाठी देखील महत्वाचं आहे. हार्दिक तिन्ही फाॅरमॅटसाठी सर्वोत्तम खेळाडू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जूनमध्ये असल्यानं त्याच्याकडे सरावासाठी भरपूर वेळ आहे, असंही गावस्कर यांनी बोलताना सांगितलं आहे. याआधी हार्दिक पांड्याने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतासाठी आक्रमक खेळी केली होती.

दरम्यान, सध्या मुंबई इंडियन्स संघासाठी शिबीर कॅम्प आयोजित केलं गेलं आहे. भारतीय संघातील रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि सुर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सच्या शिबीरात दाखल झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना भरवण्यात येणार आहे. तर अंतिम सामन्यांसाठी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

रिक्षा आणि कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणं हा पर्याय नाही- प्रफुल्ल पटेल

“संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात”

जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने देवेंद्र फडणवीस आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार???

‘कोरोनाचं संक्रमण वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर…’; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More