कोहलीच प्रशिक्षक ठरवणार असेल तर सचिन, सौरभ, लक्ष्मणचं काय काम?

मुंबई | जर कर्णधारच प्रशिक्षक ठरवणार असेल तर क्रिकेट सल्लागार समितीतील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.लक्ष्मण यांचं काय काम? असा सवाल लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी विचारलाय. 

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघातील एक-एक गोष्ट बाहेर येऊ लागलीय. विराट कोहली प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींंसाठी आग्रही असल्याचं समजतंय.

दरम्यान, कुंबळे प्रशिक्षकपदी कायम राहावेत, असा सल्ला क्रिकेट सल्लागार समितीनं दिला होता. मात्र कोहलीने तो अमान्य केलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या