Top News खेळ

“संघाचं नेतृत्व करण्यासाठी इंग्लिश बोलता येणं गरजेचं नाही”

दुबई | आयपीलचा थरार सुरु झाला असून अनेक नवखे खेळाडू यामध्ये त्यांच्या खेळाची जादू दाखवत आहेत. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकाडमीद्वारे घेतल्या जाणाऱ्या मेहनतीचा हा परिणाम असल्याचं भारताचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी सांगितलं.

गावस्कर म्हणाले, राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात एनसीएने गुणी खेळाडूंवर मेहनत घेतलीये. खेळाडू कसा असतो या गोष्टीकडे एनसीएचं लक्ष असतं. तो कुठून आला आहे, या गोष्टीशी काही देणं नसतं.

गावस्कर पुढे म्हणाले, कोणत्याही खेळाडूला संघाचं नेतृत्व करण्यासाठी इंग्लिश बोलता येणं गरजेचं असतं असं नाही. एनसीएच्या माध्यमातून चांगल्या खेळाडूला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जातं.

महत्वाच्या बातम्या-

“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार केला जातो, ती देखील असंस्कारी आहे का?”

“माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार…’; शशी थरूर यांचा भाजपला टोला

नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या