बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

त्यांना हे बोलायचा अधिकार कुणी दिला??- सुनिल गावसकर

मुंबई |  कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, देशातली सध्याची परिस्थिती पाहता आयपीएल रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. आयपीएल रद्द झालं तर बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.

बीसीसीआयला नुकसान झालं तर खेळाडूंनी पगार कपातीसाठी तयार राहावं, असं वक्तव्य इंडिया क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी केलं होतं. अशोक मल्होत्रा यांच्या या वक्तव्याचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी समाचार घेतला आहे. त्यांना हे बोलण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त प्रश्न गावसकर यांनी विचारला आहे.

प्रत्येक खेळाच्या नियमांप्रमाणे जर तुम्ही खेळला नाही तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत. बीसीसीआयच्या मर्जीत येण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असल्यास समजू शकतो, पण त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का?, असं गावसकर म्हणाले आहेत.

सध्याचे आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असोसिएशनचे सदस्य नाहीत, त्यामुळे मल्होत्रा खेळाडूंच्या बाजूने बोलू शकत नाहीत. तुमच्या खिशाला कात्री लागत नसेल तेव्हा पगार कपातीबाबत बोलणं सोपं असतं, अशी टीका गावसकर यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

महत्वाच्या बातम्या-

ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही- नरेंद्र मोदी

कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ

आजची धक्कादायक बातमी; महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे 113 नवे रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More