Top News

“सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध”

पुणे | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोस्वामी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केलीये. सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध, असं सुनिल कांबळे म्हणाले आहेत.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी काँग्रेसप्रणित राज्यांमध्ये कशाप्रकारे केली जाते, हे देश पाहत आला आहे. सूडाच्या भावनेतून केलेल्या अटकेचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं सुनिल कांबळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोस्वामींची अटक कायदेशीर पद्धतीनंच झाल्याचा दावा केला.

 

 

महत्वाच्या बातम्या-

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ!

“शेतकऱ्यांसाठी एनडीए सरकारने जेवढं काम केलं तेवढं काम आतापर्यंत कुणीही केलं नाही”

राज्यात सध्या लोकशाहीची गळचेपी सुरु आहे- गिरीश महाजन

देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्जमधून डिस्चार्ज!

“अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी AK-47 घेऊन जाणारे मुंबई पोलीस देशातील सर्वात भेकड पोलीस”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या