महाराष्ट्र मुंबई

“…तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव घेत त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते मंत्री सुनील केदार यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. संजय राठोड यांचं नाव घेऊन आक्रमक झालेला असला तरी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. ते या सगळ्या प्रकारावर बोलतील, असं सुनील केदार म्हणाले.

भाजपला या प्रकरणाचं राजकारणच करायचं असेल तर मग आम्हाला भाजपचे आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल, अशी टीका सुनील केदार यांनी केली आहे.

विरोधी पक्षाचं टीका करणे काम आहे. विरोधी पक्षाने विरोध करावा. विरोधी पक्षाने फक्त टीका करुन चालणार नाही. भाजपने समजा राजकारणच करायचं म्हटलं तर दूरपर्यंत जावं लागेल. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल. आम्हाला यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही, असा टोला केदार यांनी भाजपला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना आक्रमक; संजय राठोडांना दिले ‘हे’ सक्त आदेश

IPS कृष्णप्रकाश अ‌ॅक्शन मोडमध्ये, अवैध धंदे करणारांची आता खैर नाही!

आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणार!

कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा???

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ही धक्कादायक माहिती आली समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या