वर्धा | उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारला अहिंसेच्या ताकदीचा विसर पडलाय. त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवू. ते कधी कोसळतील हेही त्यांना कळणार नाही, असं काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी म्हटलंय.
सुनिल केदार सेवाग्राममधील बापू कुटी येथे गांधी जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सुनिल केदार यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरस अत्याचार प्रकरणावरून भाजपवर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या देशात अजूनही लोकांना हिंसा आणि अहिंसा यातील फरक कळत नाही. त्यांना अहिंसेच्या ताकदीचा विसर पडला असेल तर येणाऱ्या काळात लोकशाहीच्या माध्यमातून हिंसेचं समर्थन करणाऱ्यांना अहिंसेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं सुनिल केदार म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
…याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही- संजय राऊत
‘मुलगी कोरोनाने मेली असती तर…’; हाथरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांचं धक्कादायक वक्तव्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण!
पुण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून!
Comments are closed.