वर्धा | कोरोनानंतर आता काही दिवसांपासून मोर, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्षांचे मृत अवस्थेत पडलेले फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे बर्ड फ्लूची साथ आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे माणासालाही याचा धोका असल्याचे मेसेज व्हाट्सअॅपवर व्हायरल झाले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आयडिया केली आहे.
बर्ड फ्लू संबंधी वेगळा फार्स निर्माण झाला तो थांबवला पाहिजे. देशात बर्ड फ्लूमुळे आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्लूने एकाही माणसाचा मृत्यू झाला असेल तर तो शोधून द्या. त्याला मी रोख रक्कम बक्षिस म्हणून देईल, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे.
बर्ड फ्लूमुळे सर्वात मोठं नुकसान राज्याच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचं होतं. बर्ड फ्लूचा फटका शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगार करणाऱ्या मुलांना बसतो. त्यामुळे हा मुद्दा संवेदनशिल असल्याचं सुनील केदार म्हणाले.
दरम्यान, बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त ही आहेत.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! गावकऱ्यांनी जळता टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं
नोटाबंदीनंतर चलनातील या महत्वाच्या नोटा होणार बंद??; RBI ची महत्वाची माहिती
‘तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…’; जसप्रीत बुमराह झाला भावूक!
‘आई बहिणीवरून त्यांनी वडिलांना शिव्या दिल्या पण…’; वडिलांच्या आठवणीत भरत जाधवची भावूक पोस्ट
प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील