एअरटेलच्या सुनिल मित्तल यांच्याकडून 7 हजार कोटी दान

नवी दिल्ली | एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनिल मित्तल यांनी आपल्या संपत्तीतील 10 टक्के भाग दान करण्याची घोषणा केलीय. भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून मित्तल 7 हजार कोटी रूपये सामाजिक कामासाठी दान करणार आहेत.

दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरूण तरूणींच्या मोफत शिक्षणासाठी सत्य भारती विश्वविद्यापीठाची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. त्याचबरोबर एअरटेल कंपनीतील 3 टक्के शेअर सामाजिक कामासाठी दान केलेत.

सुनिल मित्तल यांनी उदारपणानं दान केल्यामुळे समाजामध्ये खऱ्याखुऱ्या श्रीमंतीचं उदाहरण घालून दिलं आहे.