मुंबई | मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’ सिनेमातील विस्मरण होणाऱ्या आमिर खानच्या व्यक्तिरेखेसारखी झाल्याची बोचरी टीका माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंनी केली.बोंडेंच्या या टीकेला आता शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अनिल बोंडेंनी सवंग लोकप्रियतेसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं. ते म्हणजे अनिल बोंडे यांनी स्वतःची लायकी ओळखून सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे, अशी घणाघाती टीका सुनील प्रभूंनी केली आहे.
अनिल बोंडेंनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं दिली. विदर्भातील प्रश्नांची जाण असल्याचं दाखवून विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांनी ज्या पद्धतीनं फसवलं. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत बोंडेंना घरी बसावं लागलं, असा टोलाही सुनील प्रभूंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
या’ देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी
कोहली आणि डिव्हीलियर्सवर आपीएलमध्ये बंदी घाला; लोकेश राहुलची मागणी
पावसामुळे कात्रजमध्ये झालेल्या बिकट परिस्थितीला पुणे पालिका जबाबदार- सुप्रिया सुळे
उद्धवव ठाकरे पूर्वी देव मानायचे, आत्ताचं माहीत नाही- चंद्रकांत पाटील