मुंबई | एकनाथ शिंदे यांनी बंड करुन महाविकास आघाडी सरकारला संकटात लोटलं. आता त्यांनी आमचा गटच खरी शिवसेना असा दावा केला. तो शिवसेनेने फेटाळून लावला. काल रविवारी राज्याचे उच्च आणि शिक्षणमंत्री उद्य सामंत यांनी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अपक्ष मिळून शिंदे गटात आता 50 आमदार आहेत, असा दावा शिंदे गट करत आहे.
संजय राऊत यांचे सख्खे बंधू आमदार सुनील राऊत हे देखील शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जातंय. ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळते आहे. सुनिल राऊत हे बंडखोर आमदारांच्या गटात जाऊ इच्छितात असं बोललं जातं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज होते अशी चर्चा सुरु आहे.
आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी या गप्पांना पुर्णविराम दिला. सुनिल राऊत म्हणाले, आमच्या वडिलांपासून आम्ही शिवसेनेत आहोत, आम्ही शिवसेना सोडण्याचा विचारही कधी केला नाही, करणार नाही. ह्या सर्व अफवा आहेत. मला मंत्री पदाची, आमदारकीची हाव नाही. शिवसैनिक हेच आमच्यासाठी मोठे पद आहे, असंही ते म्हणाले.
शिवसेनेने बंडखोर आमदारांविरुद्ध कायदेशीर शस्त्र उगारले आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्याविरोधात शिंदे गटाने सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 3 जुलै रोजी सर्व आमदार मुंबईत येण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
“हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे, या इकडे”
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन
“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”
‘मरण आलं तरी बेहत्तर पण…’; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत
‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य
Comments are closed.