बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कर नाही त्याला डर कशाला’; भाजपने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर सुनिल शेळकेंचं प्रत्युत्तर!

पुणे | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सुनिल शेळके यांनी 10 कोटी रुपयांचा उत्खनन घोटाळा केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या सर्व आरोपांना सुनिल शेळकेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या यांना खोटी आणि अर्धवट माहिती देत माझ्यावर आरोप करायला लावले असल्याचा आरोप सुनिल शेळके यांनी भाजप नेते बाळा भेगडे यांच्यावर केला आहे. किरीट सोमय्या हे माझ्या व्यवसायाच्या जागी जाणार असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. त्यांना मीच ती माहिती दिल्याचं सुनिल शेळके म्हणाले. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर पलटवार केला आहे.

मावळमधील काही नेते किरीट सोमय्यांना घेऊन गेले आणि त्यांना अर्धवट माहिती दिली गेली आहे. त्याआधारे सोमय्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. मात्र त्यांचे हे आरोप बिनबुडाचे आणि खोटे असून त्यांच्या आरोपाला कुठलाही पुरावा नाही. आम्ही जो व्यवसाय करतो तो शासन मान्य आहे, असं सुनिल शेळकेंनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची किंवा सामान्य माणसाची तक्रार नसताना राजकीय व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्यावर दबाव टाकण्यासाठी आरोप केले आहेत. त्या आरोपांना मी घाबरणार नसून कर नाही त्याला डर कशाला, असं म्हणत शेळकेंनी आपली खुशाल चौकशी करावी, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या वयातही आशाताई काय दिसतात ना’; राज ठाकरेंनी केली आशा भोसलेंची प्रशंसा

मोठी बातमी! रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर रद्द, उदय सामंतांच्या भेटीनंतर मोठा निर्णय

पावसाची बातमी! पुण्यासह सातारा जिल्हात पावसाचं पुनरागमन

मोठी बातमी! 14 ऑगस्ट ‘हा’ दिवस म्हणून ओळखला जाणार, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

“बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरूष”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More